आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:शनिवारी 514 उमेदवार देणार एमपीएससी गट क सेवेची परीक्षा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत महाराष्ट गट-क सेवा मुख्य परीक्षा, संयुक्त पेपर क्रमांक २, कर सहायक परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दोन केंद्रांवर ५१४ उमेदवार ही परीक्षा देतील. तर या परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी ९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली.

हॉलतिकीट, आधार कार्ड किंवा इतर अधिकृत ओळखपत्र असेल तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, हॉलतिकीट व ओळखपत्राशिवाय अन्य कोणतेही साहित्य परीक्षा कक्षामध्ये नेता येणार नाही. मनाई असताना असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...