आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशैक्षणिक वर्ष 2023-2024 साठीची आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, यंदा 4 हजार 73 जागांसाठी 5 हजार 147 अर्ज आले आहेत. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 15 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठीची मुदत आहे. संकेतस्थळावर येत असलेल्या तांत्रिक अडथळयांमुळे अडचणी येत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. तर ज्यांना काही अडच असेल त्यांनी शिक्षण विभागात संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. सुरुवातीला 10 फेब्रुवारीपर्यंत शाळांकडून नोंदणी प्रक्रिया करुन घेण्यात आली. 1 मार्च पासून पालकांनी त्यांच्या पाल्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पालकांना नोंदणीसाठी 15 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र संकेतस्थळावर अडचणी येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत. त्यामुळे आपली संधी तर जाणार नाही ना? मुदतवाढ द्यायला हवी अशी मागणी पालकांकडून होतेे आहे. यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, संकेतस्थळावर अडचणीच्या तक्रारी अद्याप आमच्याकडे आलेल्या नाहीत.
पालकांनी सर्व सूचना नीट वाचून घेवून आणि शाळांची संपूर्ण माहिती घेवून आपले अर्ज भरावेत. काही समस्या आल्यास शिक्षण विभागात संपर्क करावा असे आरटीई प्रवेश समन्वयक यांनी सांगितले. यंदा आरटीई प्रवेशासाठी 547 शाळा पात्र असून, त्यांची प्रवेश क्षमता 4 हजार 73 आहे. रविवारपर्यंत या जागांसाठी 5 हजार 147 जणांचे अर्ज आले आहेत. अर्ज प्रक्रियेनंतर छाननी होवून प्रवेशाची सोडत काढली जाणार आहे.
अशी आकडेवारी
तालुका ---- शाळा -- प्रवेश क्षमता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.