आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी झिरोदावर खाते उघडून मदतीसाठी गुगलवरून हेल्पलाइन क्रमांक घेणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. तो नंबर सायबर गुन्हेगारांचा निघाला. त्यांनी झिरोदा कस्टमर केअरचे कर्मचारी असल्याचे सांगून मदतीसाठी अॅप इन्स्टॉल करायला लावून व्यावसायिकाचे ५ लाख १६ हजार ४९३ रुपये आॅनलाइन लंपास केले.
दिनेश हिरालाल अग्रवाल (४६, रा. वाळूज) यांचे किराणा दुकान आहे. ३ मार्च रोजी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी झिरोदावर डी-मॅट खाते सुरू केले. त्यांनी त्यात पाच हजार रुपये आरटीजीएस केले. मात्र, ते जमाच झाले नाही. त्यामुळे त्यांनी ४ मार्च रोजी गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक शोधून संपर्क केला तेव्हा अॅलपेमिक्स, एनीडेस्क इन्स्टाॅल करण्यास सांगून माेबाइलचा ताबा घेत आराेपींनी त्यांच्या बँक खात्यातून दहा टप्प्यांमध्ये ५ लाख १६ हजार ४९३ रुपये लंपास केले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.