आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्याला 52 लाखांचा गंडा प्रकरण:ज्योती नगरातील ओपन स्पेस भूखंड विक्रीतून फसवणूक; तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद ज्योतीनगरातील ओपन स्पेस भूखंड म्हणून विक्री करुन सिल्लोडच्‍या व्‍यापाऱ्याला तब्बल 52 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी तिघा आरोपींनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र व्‍ही.आर. जगदाळे यांनी नामंजूर केला.

रजिंदरसिंग तरलोचनसिंग धिंग्रा (60, रा. गोल्डी सिनेमासमोरे, स्टेशन रोड), रवींदरसिंग तरलोचनसिंग धिंग्रा (59, रा. बन्सीलालनगर), अजय जगन्नाथ खेमनार (46, रा. श्रेयनगर, उस्मानपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात राजेश गोकुलचंद खिवंसरा (59, रा. महाराणा प्रताप नगर, सिल्लोड) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, त्यांना औरंगाबादेत घर बांधायचे असल्याने ते प्लॉटच्या शोधात होते. आरोपी आशिष शाहा याच्यामार्फत खिवंसरा यांना 301.2 चौरस मीटरचा रोहिणीनगर, ज्योतीनगरातील प्लॉट क्र. 19, सिटी सर्व्हे नं. 16034/20, शिट नं. 171 हा विक्रीला असल्याचे समजले. रगडे व शाहा यांनी प्लॉट मालक म्हणून रजिंदरसिंग धिंग्रा, रवींदरसिंग धिंग्रा व अजय खेमनार यांची भेट घालून दिली. प्लॉट पसंद पडल्यावर वाटाघाटी करून 52 लाख रुपयांना व्यवहार ठरला.

खरेदीखताद्वारे व्यवहार करण्याचे ठरले. 14 जानेवारी 2019 ला जाहीर प्रगटन दिले मात्र त्यावर कोणाचेही आक्षेप आले नाहीत. तेव्हा आरोपींनी मनपाचा बांधकाम परवाना, मुंद्राक शुल्क, नोंदणी फी, मनपा टॅक्स व इतर चार्जेससाठी रजिंदरसिंग धिंग्रा यांनी आधीच पाच लाख रुपये घेतले होते. तेथे बांधकम करता येईल, असे आरोपींनी खिवंसरा यांना सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून 7 ऑक्टोबर 2019 रोजी खरेदीखत करण्यात आले. त्यादरम्यान, खिवंसरा यांनी 14 धनादेशाद्वारे तब्बल 52 लाख रुपये आरोपींना दिले. खरेदीखतानंतर कोरोना लाट आली. त्यामुळे खिवंसरा हे बांधकाम करू शकले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खिवंसरा हे त्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी हालचाली करू लागले. तेव्हा परिसरातील लोकांनी त्यांना विरोध केला. खरेदीखत दाखविल्यानंतर हा प्लॉट या परिसरातील खुली जागा असून येथे बांधकाम करता येणार नाही, असे सांगितल्यावर खिवंसरा यांना धक्का बसला. प्रकरणात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींनी गुन्‍ह्यात अटक होऊ नये यासाठी जामीन अर्ज सादर केला. अर्जावरील सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता नामदेव पवार यांनी आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले चालान, शिक्के व इतर बनावट कागदपत्रे कोठून व कोणाकडून तयार केले याचा तपास बाकी असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन देत आरोपींच्‍या जामीनीला विरोध केला.

बातम्या आणखी आहेत...