आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वदूर पावसाची आस:ऑगस्टमध्ये 52 टक्के तुटीचा पाऊस, उस्मानाबाद 75, तर औरंगाबादेत 64.6 टक्के झाला पाऊस

संतोष देशमुख | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात 1 ते 28 ऑगस्टपर्यंत 174.6 मिमी पाऊस अपेक्षित आहे. याच्या तुलनेत फक्त 85.5 मिमी म्हणजे 49.1 टक्केच प्रत्यक्ष पाऊस पडला. हवामान बदलामुळे जोरदार पावसाला हुलकावणी मिळाली व 51.9 टक्के पावसाची तूटही पडली आहे. उस्मानाबादेत 75.4, औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 64.6 टक्के सर्वाधिक, तर परभणीत केवळ 27.7 टक्केच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने जूनमध्ये कमी, तर जुलै व ऑगस्टमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. प्रत्यक्षात जूनच्या दुसऱ्या पंधवड्यात जोरदार पाऊस बरसला. जुलैमध्ये तर विक्रमी पाऊस झाला. या दोन महिन्यांत ३२०.२ मिमीच्या तुलनेत ४९० मिमी म्हणजे १५३ टक्के पर्जन्यमान होण्याचा विक्रम झाला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाने उसंत घेतली आहे. जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस पडतोय. उर्वरित ठिकाणी ढगांचे आच्छादन असते व पावसाला हुलकावणी मिळत आहे. परिणामी गत २८ दिवसांत अपेक्षित पावसाच्या ५२ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. पावसाच्या खंडाने डोलू लागलेल्या पिकांची अवस्था खराब होत चालली आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. सर्वदूर मोठ्या पावसाची आस लागली आहे.

परभणीत फक्त 27 टक्केची झाली नोंद; शेतकरी अडचणीत
ऑगस्टमधील पर्जन्यमानाचा आलेख
जिल्हा अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी
औरंगाबाद १३८.९ ८९.७ ६४.६
जालना १४६.६ ७९.० ५३.९
बीड १२४.६ ५८.९ ४७.३
लातूर १८३.१ ७२.४ ३९.५
उस्मानाबाद १३९.५ १०५.१ ७५.४
नांदेड २२३.४ १०९.५ ४९.०
परभणी २०५.८ ५७.४ २७.९
हिंगोली २१७.९ ११९.२ ५४.७
एकूण १७४.६ ८५.७ ४९.१

पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता,

तूट भरून निघण्याची शक्यता
ऑगस्टमधील पावसाच्या तुटीने दीडशे टक्क्यांवर असलेल्या पावसाची सरासरी ११६.४ खाली आहे. म्हणजे अजूनही सरासरीच्या तुलनेत १६.४ टक्के जास्त पाऊस झालेला आहे. पण अतिवृष्टीने व कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने सरासरी वेगाने वाढली आहे. यामुळे नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. आता पावसाची तूट पडल्याने पुन्हा पिकांना फटका बसत आहे. पुढे पाऊस चांगला होणार असल्याने पावसाची तूट भरून निघेल, अशी अपेक्षा हवामान तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना वर्तवली आहे.

पावसासाठी अनुकूल वातावरण
सूर्य तळपू लागला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. बाष्पयुक्त ढग खेचून येत आहेत. त्यामुळे आजपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरणाचा निर्मिती होत आहे. मात्र, जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस पडेल.

नऊ दिवस पावसाचे
हवामानातील घटकांचा अभ्यासातून सप्टेंबर महिन्यात ९ दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचे दिसून येत आहे. या पावसामुळे ऑगस्ट महिन्यातील तूट भरून निघणार आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान शास्त्त्रज्ञ, पुणे.

494.8 मिमी पाऊस १ जून ते २८ ऑगस्ट (अपेक्षित) 557.7 मिमी प्रत्यक्ष झालेले पर्जनमान्य 116.4 टक्के प्रत्यक्ष पावसाची टक्केवारी.

बातम्या आणखी आहेत...