आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहिती:52 हजार 876 उद्योग सुरू, 11 लाख कामगार कामावर : उद्योगमंत्री देसाई

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील आर्थिक व्यवहार सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे-शरद यांच्यात पवार चर्चा

लॉकडाऊनमध्येही राज्यातील ५२ हजार ८६७ उद्योग सुरू झाले असून ११ लाख ५५ हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. अडचणींतून मार्ग काढला जात असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. शनिवारी ते औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. चिकलठाणा विमानतळासमोर सिपेटच्या जागेवर एमआयडीसीकडून २५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करण्यात येत आहे त्याची पाहणीही देसाई यांनी केली. १० जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कार्यकारी अभियंता भूषण हर्षे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवार चर्चा

केंद्र सरकारने लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. राज्यात टप्प्याटप्याने आर्थिक व्यवहार सुरू करावेत, असा पवार सातत्याने आग्रह करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांमधील चर्चेनंतर रविवारी राज्य सरकार निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...