आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या साडेपाच वर्षांपूर्वी सुरू झालेले शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्यातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात व्यग्र विमानतळ झाले आहे. येथील विमान वाहतूक वाढल्याने प्रवाशांना जागा अपुरी पडत आहे. यामुळेच राज्य शासनाने ५२७ कोटी रुपये खर्चून याच्या विस्तारीकरणाची योजना आखली आहे. विमानतळावर नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग तयार केली जाणार असून त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असतील. दोन मजली, १५ मीटर उंची, ५.७४ लाख चौ. फुटांचे बांधकाम असणारी इमारत दोन वर्षांत पूर्ण होईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विविध विमानतळांसाठी निधीची घेाषणा केली. यात शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारण्याची घोषणा होती. प्रत्यक्षात महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) ६ मार्च रोजीच याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली. २१ एप्रिल रोजी त्या खुल्या केल्या जातील. निविदेच्या दस्तऐवजात नवीन टर्मिनलची सविस्तर माहिती आहे.
प्रवासी हाताळण्याची क्षमता : सध्याच्या इमारतीत तासाला ३०० प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. नवीन इमारतीत व्यग्र वेळेमध्ये ताशी १२०० प्रवासी (पीक अवर्स पॅसेंजर-पीएचपी) हाताळता येतील. यात प्रत्येकी १२० परदेशी, तर ४८० देशी असे जाणारे व येणारे मिळून १२०० प्रवाशांचा समावेश असेल.
दोन वर्षांत काम पूर्ण एमएडीसीनुसार, हे अत्यंत प्रतिष्ठेचे काम कोणत्याही परिस्थितीत नियोजित २ वर्षांत पूर्ण झाले पाहिजे. या काळात विद्यमान विमानसेवेवर परिणाम होऊ न देता काम पूर्णत्वास न्यावे लागेल. कामगारांच्या वस्त्यांसाठी एमएडीसी कामासाठी जागा देईल. विमानतळ असल्याने कडक सुरक्षा तपासण्या होतील अशा सूचनांवरून कामाच्या बाबतीत शासनाचे गांभीर्य दिसून येते.
या सुविधांचाही समावेश {कॉन्टॅक्ट स्टँड्स {रिमोट बोर्डिंग {बॅगेज हँडलिंग {फायर प्रोटेक्शन सिस्टिम {सीसीटीव्ही {पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टिम {विमानांच्या माहितीचे डिजिटल फलक {एअरपोर्ट साईनेजेस {ईपीबीएक्स {डेटा सेंटर {डायरेक्ट टेम्परेचर कंट्रोल सिस्टिम {मध्यवर्ती निगराणी कक्ष {अपारंपरिक ऊर्जेचे व्यवस्थापन, सोबत विमानतळातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा २४० घनमीटर प्रतिदिवस क्षमतेचा प्रकल्प.
राज्यातील चौथे व्यग्र विमानतळ शिर्डी विमानतळावर हवाई वाहतुकीला ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरुवात झाली. अल्पावधीतच यास मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ते पुणे, मुंबई व नागपूरनंतर राज्यातील सर्वात व्यग्र विमानतळ ठरल्यामुळे येथील सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. भविष्यात तर यामुळे अधिक अडचण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) विमानतळाच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.