आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी निधी:गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भरपाईसाठी 53 कोटींचा निधी जमा

गंगापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी गंगापूर तालुक्यातील ४५,९६५ शेतकऱ्यांच्या ३७११९ हेक्टरसाठी ५३ कोटी ५८ लाख ६६ हजार २०० रूपये जमा झाले आहेत. काही दिवसांत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ९ महसूल मंडळांपैकी ज्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, ज्यात गंगापूर, सि. वाडगाव, हर्सूलसह इतर मंडळांमधील काही गावांचा समावेश आहे अशा एकूण ४५,९६५ शेतकऱ्यांच्या ३७,११९ हेक्टर पिकांच्या नुकसानीपोटी मदत म्हणून शासनाने ५३ कोटी मंजूर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...