आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षभरात वाळूचोरी प्रकरणात २९५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्ह्याला गौण खनिज विक्रीमधून ५३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. राज्य शासनाने वाळू वितरणाचे नवे धोरण आणलेले आहे. मात्र, गेल्या वर्षभरात कोणतेही धोरण ठरलेच नसल्यामुळे वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले नाहीत. छत्रपती संंभाजीनगर जिल्ह्याला गौण खनिजमधून ७८ कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट होते. यामध्ये २१ वाळूपट्टे लिलावात जाणे अपेक्षित होते. त्यासाठी पर्यावरणीय परवानग्याही घेण्यात आल्या होत्या. मात्र, वाळूपट्ट्यांबाबत राज्य शासनाकडून नवीन धोरण येणार असल्यामुळे त्याची लिलाव प्रक्रिया झालीच नाही.
पाच कोटी ५४ लाख रुपयांंचा दंड रस्ते बांधकामात वापरली जाणारी खडी खदानीतून तयार केली जाते. जिल्ह्यात ४९ खदानी आहेत. गौण खनिज विभागाला खदानी तसेच मुरूम, दगड यामधून ५३ कोटींचा महसूल मिळाला आहे. वाळूचोरीच्या एकूण २९५ कारवायांमध्ये पाच कोटी ५४ लाख रुपयांंचा दंड ठोठावला असून त्यापैकी ३ कोटी ३७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वाळूपट्ट्यांचे लिलाव नसल्याने ७८ कोटींचे उद्दिष्ट साध्य झाले नाही
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.