आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघात 54 हजार मतदार:सर्वाधिक औरंगाबादेत; आज यादी प्रसिद्ध होणार, 9 डिसेंबरपर्यंत नोंदणी सुुरू

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीसाठी १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत औरंगाबाद विभागात ५४,४१३ मतदार नोंदणी झाली. २ हजार मतदारांचे अर्ज फेटाळण्यात आले. प्रारूप मतदार यादी २३ तारखेला प्रसिद्ध होणार असून ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार असल्याची माहिती उपायुक्त जगदीश मणियार यांनी दिली आहे.

शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच महसूल मंडळाच्या ठिकाणी नमुना ५ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात आहे. एकत्रित प्रारूप मतदार यादी www.ceo.maharashtra.gov.in व www.aurangabad.gov.in या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.

जिल्हानिहाय मतदार संख्या जिल्हा पुरुष महिला एकूण औरंगाबाद ७६४० ४२८६ ११,९२६ लातूर ७८५४ २३६८ १०,२२२ जालना ३६६६ ६३७ ४३०३ परभणी ३३३५ ५२९ ३८६४ हिंगोली २४१४ ४४८ २८६२ नांदेड ६५१४ १५९६ ८११० बीड ६७५५ १६३३ ८३८८ उस्मानाबाद ३९३२ ८०६ ४७३८ एकूण ४२११० १२३०३ ५४४१३

बातम्या आणखी आहेत...