आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत 5.5 किलो गांजा जप्त:एनडीपीएसच्‍या विशेष पथकाने छापा; संशयित महिलेला 8 सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात गांजाचा साठाकरुन त्‍याची विक्री करणाऱ्या महिलेला एनडीपीएसच्‍या विशेष पथकाने छापा मारुन बेड्या ठोकल्या. महिलेच्‍या घरातून साडेपाच किलो गांजासह सुमारे 67 हजार 672 रुपये किंमतीचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला. ही कारवाई 5 सप्‍टेंबर रोजी रात्री हर्सुल परिसरातील रामेश्‍वरनगरात करण्‍यात आली.

रंजना सचिनकुमार पांडे (48, रा. रामेश्‍वनगर, मयुरपार्क रोड, हर्सुल) असे संशयित आरोपी महिलेचे नाव असून तिला 8 सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी मंगळवारी ;6 दिले.

प्रकरणात एनडीपीएस विशेष पथकाचे सहायक फौजदार नसीम खान शब्बरी खान (54) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्‍वर घुगे, अंमलदार सुरेश भिसे, धर्मरजा गायकवाड, महेश उगले, प्राजक्ता वाघमारे आणि चालक डी.एस. दुभळकर हे परिसरात गस्‍त घालत होते. त्‍यावेळी रामेश्‍वर नगरात वडाच्‍या झाडाशेजारी राहणारी रंजना पांडे ही घरात गांजाचा साठाकरुन विक्री करित असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्‍यानूसार पथकाने छापा मारुन रंजना पांडे हिला अटक केली. तिच्‍या घर झडतीत 66 हजार 252 रुपये किंमतीचा 5 किलो 512 ग्रॅम गांजा, दोन मोबाइल आणि 420 रुपयांची रोख रक्कम असा सुमारे 67 हजार 672 रुपये किंमतीचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे. प्रकरणात हर्सुल पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपी रंजना पांडे हिला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपी रंजनाने गांजा कोठून व कोणाकडून आणला, तसेच कोणाला विक्री करणार होती. आरोपीने आणखी कोठे गांजाचा साठा करुन ठेवला आहे काय, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपी रंजनाला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...