आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रंक अँड ड्राइव्ह, अपघात:नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात 55 जण झाले जखमी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाचे स्वागत करताना अतिमद्य प्राशन केल्याने, हाणामाऱ्या केल्याने आणि अपघातात जखमी झालेल्याची संख्या ५५ आहे. ८ मद्यपी दारू पिऊन वाहन चालवताना आढळले. अति मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात ३१ जण जखमी झाल्याची नोंद घाटीत आहे. किरकोळ प्रकारच्या १६ हाणामाऱ्यात जखमी झालेल्यांची संख्या १६ आहे.

यंदा प्रथमच नववर्षाच्या स्वागतासाठी ढाबे, बिअर बार, रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस चौका-चौकात तैनात होते. अनेक मित्रमंडळे व राजकीय पक्षांकडून मसाला दुधाचे मोफत वाटपही करण्यात आले. मात्र, अनेक जणांनी मद्यप्राशन करूनच नववर्षाचे स्वागत करणे पसंत केले. त्यातून ड्रंक अँड ड्राइव्हच्या अनेक घटना घडल्या. त्यात हे मद्यपी तर जखमी झालेच. मात्र, त्यांच्यामुळे इतर सर्वसामान्य नागरिकही जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...