आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या 55 शाळा होणार ‘आदर्श शाळा’, राज्य शासनाचा निर्णय, राज्यातील 300 शाळांचा समावेश

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत केल्या जाणार असून यामध्ये मराठवाड्यातील ५५ शाळांचा समावेश आहे. या बाबतचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना भैतिक सुविधांसोबत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांमध्ये आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय या सारख्या भौतिक सुविधा असणार आहेत. या शिवाय शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षण देतील. वाचनाचा सराव करणे, विद्यार्थ्यांना प्राथमिकस्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभुत संकल्पना असेल. या आदर्श शाळेकडे लोक आकर्षित होऊन इतर शाळा सोडून या शाळेत पाल्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या शाळेत काम करण्यासाठी इच्छूक असलेल्या शिक्षकास पाच वर्षापर्यंत बदली मागता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

दरम्यान, मराठवाड्यातील निवडण्यात आलेल्या ५५ शाळांमध्ये हिंगोली जिल्हा ः पिंपळदरी, सुकळी, पेडगाव, वारंगाफाटा, हाताळा. औरंगाबाद जिल्हा ः कचनेर, डोमेगाव, वडोद, सुलतानपुर, पीरबावडा, जारूळ, देऊळगाव बाजार. बीड जिल्हा ः येलदा, पांगरा, हिवराफडी, आमला, बनकारंजा, पिंपळवंडी, राक्षसभुवन आमला (ता.गेवराई). जालना जिल्हा ः म्हाकाळा, बव्हाणे पांगरी, बरंजाळा साबळे, नांदापुर, केंधळी. लातुर जिल्हा ः कुमठा बुद्रुक, रचनावाडी, वेलेगाव, गुट्टी, कांदी बोरगाव, मदनसुरी, खारोळा, हिप्पेलगाव, नंदुरगा. नांदेड जिल्हा ः आंबेगाव, देवठाणा, अटकळी, मिरखेल, वडगाव, पाथरड, अंबुलगा, कोसमेट, धानोरा, तुळशीतांडा, सेलगाव. उस्मानाबाद जिल्हा ः वलवड, हिप्परगारावा, बलसुर, पळसप, पिंपळवाडी, खुडावाडी. परभणी जिल्हा ः कोरवाडी, मांडाखळी, पोहेटाकळी, गवळी पिंपरी या गावांचा समावेश आहे.

दर शनिवारी होणार दप्तरमुक्त शाळा

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तणावरहित वातावरण मिळणे आवश्‍यक आहे. पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शाळेच्या परिसरात उपलब्ध साधन सामुग्रीमधून विविध विषयातील ज्ञान घेता यावे यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...