आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांसाठी अखेर ५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.मसिआने दहा ते बारा वर्षांपासून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र,अनेक वर्षांपासून नियमितपणे कर देऊनही महानगरपालिका किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून योग्य दखल घेतली जात नव्हती. मसिआच्या ‘रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहाच्या’ उद्घाटनास उपस्थित असणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधील रस्त्याबाबत खंत व्यक्त केली होती.
त्यासोबतच अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांकडे त्यासाठी तत्काळ विशेष निधी देण्याची विनंती केली होती. या सर्वच बाबींची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पुढाकार घेतल्याने अखेर ३ फेब्रुवारीला उद्योगमंत्री सामंत यांनी प्रलंबित प्रस्तावावर स्वाक्षरी करत रस्ते कामासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, सचिव राहुल मोगले यांनी दिली.
‘दिव्य मराठी’ने केला रस्त्यांसाठी पाठपुरावा ‘कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकांचा रस्ते, पाणी, विजेसाठी झगडा, चिकलठाणा औद्योगिक परिसरात सुविधांची आबाळ’ या मथळ्याखाली २५ जानेवारी रोजी ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच आठव्याच दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रस्त्यांसाठी ५८ कोटी रुपये मंजूर केले. रस्ते पूर्ण होईपर्यंत ‘दिव्य मराठी’ पाठपुरावा करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.