आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सावखेड्यात तुरीत लावलेला 46 लाखांचा 581 किलो गांजा जप्त

पिंपळगाव हरेश्वर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या सावखेडा शिवारात तुरीच्या पिकात गांजाचे आंतरपीक लावल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शेतकरी सुभाष पाटील (रा.सावखेडा, ता.पाचोरा) याला अटक केली अाहे. त्याच्या शेतातून ४६ लाख ४८ हजार रुपये किमतीचा ५८१ किलो गांजा जप्त केला आहे.

माहितीनुसार, संशयित सुभाष पाटीलने आपल्या शेतात कपाशीत तुरीची लागवड केली होती. तसेच तुरीच्या दोन ओळींमध्ये त्याने गांजाची २०० झाडे लावली होती. या प्रकाराची पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी बुधवारी रात्री धडक कारवाई केली. पोलिसांनी शेतात छापा टाकून गांजाची २०० झाडे जप्त केली. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र वाघमारे, उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार रणजित पाटील, पोलिस नाईक अरुण राजपूत, शिवनारायण देशमुख, संदीप राजपूत, अभिजित निकम, दीपक सोनावणे, प्रमोद वाडीले आदींनी ही कारवाई केली.

दोन ओळींमध्ये गांजाच्या २०० झाडांची लागवड समान दिसणाऱ्या पिकांमुळे फायदा तुरीच्या झाडांपेक्षा गांजाच्या रोपांची उंची काहीशी कमी असते. तसेच गांजा व तुरीची पाने जवळपास सारखीच दिसतात. त्यामुळे लांबून पाहिल्यानंतर तुरीच्या शेतात गांजा लावल्याचे लवकर समजत नाही. याचा फायदा घेत संशयिताने तुरीच्या पिकात गांजा लावला होता.

तुरीमध्येच का करतात लागवड? बहुतांश ठिकाणी गांजाची लागवड कपाशीत आंतरपीक म्हणून लागवड होणाऱ्या तुरीतच केल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे गांजाच्या झाडांची पाने तुरीसारखीच दिसतात. शिवाय या झाडांची उंचीदेखील तुरीच्या झाडाएवढीच सुमारे ५ फुटांपेक्षा जास्त असते. तुरीच्या उग्र वासात गांजाचा वास ओळखता येत नाही.

पाच ते साडेपाच फूट उंची सावखेडा येथील प्रकरणात संशयिताने तुरीमध्येच गांजाची लागवड केली होती. गांजाचे पीक सुमारे साच ते साडेचार महिन्यांचे असते. आता या झाडांची उंची सुमारे ५ ते साडेपाच फूट होती. अजून पंधरा दिवसांनी शेतातील हे गांजा पीक काढणीवर आले असते. मात्र, त्यापूर्वीच बिंग फुटून कारवाई झाली.

मजुरांच्या माध्यमातून हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला, िबंग फुटले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित काही वर्षे मुंबईत खासगी वाहनचालक होता. कालांतराने तो गावात स्थायिक झाला. यापूर्वी त्याने काही प्रमाणात गांजा लागवड केलेली असावी. त्यातून वाढलेल्या लालसेपोटी त्याने यंदा मोठ्या संख्येने गांजा लावला. पण, काही मजुरांच्या माध्यमातून हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला.

बातम्या आणखी आहेत...