आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परशुराम जयंती:६ ढोल पथके, लेझीमच्या गजरात भगवान परशुराम जयंती उत्साहात, उंटासह फुलांच्या रथांनी वेधले लक्ष

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांनंतर शोभायात्रा काढून भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शोभायात्रेत उंट, घोडे, ढोल पथकांसोबतच समाजिक देखाव्यातून संदेश देत भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मण समाज समन्वय व परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी औरंगपुरा येथे मान्यवर व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवान परशुराम स्तंभ व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी या शोभायात्रेला संस्थान गणपतीपासून सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी करवीर पीठचे श्री शंकराचार्य व माई महाराज, चारही वेदांच्या वेदाचार्यांच्या उपस्थितीत पूजन, आरती करण्यात आली. त्यानंतर शहागंज, सराफा, सिटी चौक, मछली खडक, औरंगपुरा मार्गाने परशुराम स्तंभ औरंगपुरा येथे मिरवणुकीची सांगता झाली. यादरम्यान, विविध संघटनांसह ६ ढोल पथकांत ७०० ते ८०० जणांचा समावेश होता. संस्थान गणपती येथे ढोल पथकांनी उत्कृष्टरीत्या ढोल वाजून उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

यात महिलांनी पारंपरिक मराठमोळी नऊवारी, डोक्यावर फेटा तर काही महिलांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन मिरवणुकीत लक्ष वेधून घेतले. लेझीम पथक, महिला मशाल पथक, तीन सुशोभीत रथ, घोडे, उंटांसोबतच सामाजिक देखाव्यांने लक्ष वेधून घेतले. समन्वयक मिलिंद दामोदरे, सुरेश देशपांडे, मंगेश पळसकर, गीता आचार्य, संजय मांडे, विनोद मांडे, माणिक रत्नपारखी, आनंद तांदुळवाडीकर, अनिल खंडाळकर, धनंजय पांडे, अरविंद पाठक, रवींद्र सुतवणे, जीवन जोशी, विजया अवस्थी, संदीप कुलकर्णी, आशिष सुरडकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...