आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातूनच​​​​​​​ हादरा:नाराज एकनाथ शिंदे यांच्या सोबत औरंगाबादचे 6 आमदार!

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड पुकारुन १३ आमदारांना आपल्या बाजूने घेतले आहे. या 13 आमदारांमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेतील काही आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे मोठी ताकद असलेल्या औरंगाबाद शहरातही शिवसेनेला सुरुंग लागल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भूमरे, संजय शिरसाठ, उदयसिंग यांसह आणखी काही दिग्गजांची नावे समोर येत आहेत.

मुंबईनंतर शिवसेनेची सर्वाधिक ताकद औरंगाबादेत आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या नाराजी नाट्यात शहरातील एकूण 9 आमदारांपैकी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या मनपा निवडणूकीतही शिवसेनेला याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या येथे शिवसेनेचे 9 आमदार आहेत. यापैकी 6 आमदार फुटल्यास मनपाच्या दृष्टीनेही शिवसेनेसाठी हा मोठा हादरा असेल. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या 13 जणांच्या गटात औरंगाबाद जिल्ह्यातील 6 आमदारांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

गुजरातमधील भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सध्या हॉटेल ली मेरिडियन येथे मुक्कामी असून सोमवारी रात्रीपासूनच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंनी 11 आमदारांसह बंड पुकारले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास वेळ लागणार नाही, या भीतीनं महराष्ट्रात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा सध्या गुजरातच्या दिशेने खिळल्या आहेत.

औरंगाबादचे ते आमदार कोण?

कन्नड विधानसभेचे उद्यसिंह राजपूत, औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे संजय शिरसाठ, वैजापूर विधानसभेचे रमेश बोरणारे, औरंगाबाद मध्य विधानसभेचे प्रदिप जैस्वाल, सिल्लोड विधानसभेचे अब्दूल सत्तार, पैठण विधानसभेचे संदीपान भुमरे यांचा समावेश आहे.