आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेवरची बाधा:गोवरचे 6  नवे संशयित; एकूण संख्या 142  वर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुरुवारी गोवरची आणखी सहा संशयित बालके आढळून आली. आता एकूण संशयितांची संख्या १४२ वर पोहाेचली आहे. उर्वरित बालकांचे अहवाल हाफकिन प्रयोगशाळेकडून अद्याप आले नाहीत.संशयित १४२ पैकी १७ पॉझिटिव्ह निघाले आहेत.

गुरुवारी चिकलठाण्यात दाेन, बायजीपुरा, भवानीनगर, शहाबाजार, गरम पाणी या भागात प्रत्येकी एका बालकास गाेवरची बाधा झाल्याचे समाेर आले. दहा ठिकाणी शिबिरे घेऊन ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील २३१ बालकांचे लसीकरण करण्यात आले. एमआर-१ चे २६ बालकांना आणि एमआर-२ चे ३१ बालकांना डोस देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...