आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • 6 Smart Buses To Run On 7 New Routes From Today; 240 Rounds During The Day, Due To The Strike Of ST Staff, The Administration Recruited Ex servicemen | Marathi News

औरंगाबाद:आजपासून नवीन 7 मार्गांवर धावणार 6 स्मार्ट बस; दिवसभरात 240 फेऱ्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासनाने माजी सैनिकांची केली नेमणूक

स्मार्ट बससेवा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांनंतर स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन ११ बसेस सुरू केल्या. आता सोमवारपासून (४ एप्रिल) सात नवीन मार्गांवर सहा अशा एकूण १७ बसेस शहरात धावणार आहेत. या बस दिवसभरात २४० फेऱ्या करतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाने माजी सैनिकांची नेमणूक करून १७ जानेवारीपासून स्मार्ट बससेवा सुरू केली. आजवर शहरात १०० पैकी केवळ ११ बसेस प्रमुख मार्गांवर धावत होत्या. या बस रोज १८० फेऱ्या करतात. मागील दोन महिन्यात दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. सोमवारपासून सहा बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी बसचे उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी दिली. संपकरी अजूनही कामावर येण्यास तयार नसल्याने वाहक व चालक उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे खासगी एजन्सी नियुक्त करून चालक व वाहकांची नेमणूक केली जाईल. एजन्सींकडून ४ एप्रिलपर्यंत निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याला १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडको ते करमाड बस सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, प्रवाशांची सोय होईल.

या मार्गावर नवीन बस
सिडको ते रेल्वेस्टेशन मार्गे टीव्ही सेंटर
औरंगपुरा ते रांजणगाव
औरंगपुरा ते बजाजनगर
सिडको ते घाणेगाव
सिडको ते विद्यापीठमार्गे औरंगपुरा
चिकलठाणा ते रांजणगाव
मध्यवर्ती बसस्थानक ते करमाड

बातम्या आणखी आहेत...