आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त असताना शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडाल्याने गहू, मका, हरभरा, भाजीपाला, फळबागा आदींचे नुकसान झाले आहे. राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवड्यात ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
एकट्या सिल्लोडमध्ये ३ जणांनी जीवन संपवले, तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कापसाचे भाव पडले असून त्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार बोलण्यास तयार नाहीत. वाढत्या आत्महत्यांची नैतिक जबाबदारी घेत कृषिमंत्री सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. खैरे यांनी कन्नड तालुक्यातील पिशोर, शफेपूर, भिलदरी, आंबा, उपळा आदी गावांत त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. या वेळी उपजिल्हाप्रमुख अवचित वळवले, तालुकाप्रमुख संजय मोटे, तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. सत्तार बांधावर का येत नाहीत?
खैरे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, कृषिमंत्री अब्दुल सत्तार कुठे आहेत? ते बांधावर पाहणी करण्यास का येत नाहीत? शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापसाला किडे लागले असून, त्याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. कापसाचे भाव घसरत असून, कृषिमंत्री मात्र यावर बोलायला तयार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.