आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जलसंपदातील 60 टक्के पदे रिक्त; ड्रोनने क्षेत्र मोजणीबाबत संभ्रम कायम; यंदा धरणात पुरेसा साठा असूनही सिंचन कोलमडले

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक

यंदा चांगल्या पावसामुळे राज्यातील धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे सिंचन व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागातील ६० टक्के पदे सध्या रिक्त आहेत. ड्रोनच्या माध्यमातून क्षेत्र मोजणी करण्याबाबतही अद्याप प्रशासकीय पातळीवर संभ्रम आहे. राज्यात आरोग्य, पोलिस विभागात कर्मचारी भरती सुरू आहे. मात्र शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या जलसंपदा विभागातील रिक्त पदांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. याचा फटका सिचंनाला बसत आहे.

गोदावरी पाटबंधारे महामंडळात ५६३९ पदे रिक्त
गेल्या दहा वर्षांत जलसंपदातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मात्र या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे रिक्त पदांचे प्रमाण वाढतच आहे. मराठवाड्यासह नगर, नाशिकअंतर्गत असलेल्या गोदावरी पाटबंधारे मंडळात सिंचन व्यवस्थापनाची ९३५७ पदे आहेत. सध्या यातील ५६३९ पदे रिक्त असून ३७१८ पदे कार्यरत आहेत. रिक्त पदांचे प्रमाण ६० टक्के असून केवळ ४० टक्के कर्मचाऱ्यावरच सिंचनाची कामे केली. जात असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधिक्षक अभिंयता मनोज अवलगावकर यांनी दिली आहे. मनुष्यबळाअभावी सिंचन व्यवस्थापनासाठी राज्यात विविध प्रयोग केले जात आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र मोजणी बाबत अद्याप निश्चिती नाही.

तर सिंचन कोलमडेल
राज्यात प्रकल्पीय क्षमतेनुसार ५३.०४ लाख हेक्टर इतके सिंचन आहे. राज्यात ६० टक्के पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी सिंचन व्यवस्थापन कोलमडून, त्यावर निंयत्रण राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळणार नाही. रिक्त पदे न भरल्यास असलेले पाणी वाया जाईल. सिंचन व्यवस्थापनात माणसाच्या
ऐवजी ड्रोन हा पर्याय होवू शकत नाही. - शंकरराव नागरे, माजी कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ

राज्यात सर्वत्र रिक्तपदामुळे अडचण
राज्यातील गोदावरी, कृष्णा खोरे ,विदर्भ, तापी खोरे, कोकण या पाचही पाटबंधारे महामंडळात रिक्त पदांची समस्या आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश सोनवणे यांनी सांगितले की, राज्यात दप्तर कारकुन, कालवा निरीक्षक, मोजणीदारांची १०८३८ पदे मंजुर आहेत. त्यापैकी २५१६ पदे कार्यरत असून ८३२२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन करणे अवघड होत आहे. कर्मचारी कमी असल्यामुळे शेवटपर्यंत (टेल) पाणी न पोहोचणे, पाण्याची चोरी होणे, पाणी मागणी नोंदणी न होणे, वसुली न होणे आदी अडचणी येताहेत.

ड्रोनच्या प्रयोगाबाबत संभ्रम
राज्यशासनाने कर्मचाऱ्यांच्या कमतरेमुळे सिंचनव्यवस्थापनात आता ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाने सर्व मंडळांना त्याच्या अंमलबजवाणीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याच्या सुचना आहेत. मात्र त्यासाठी किती ड्रोन लागणार, खर्च किती येणार, सिंचनाच्या वसुलीतून तो खर्च देण्याबाबत चर्चा सुरु आहे. अंमलबजावणीबाबत संभ्रम आहे.

गोदावरी पाटबंधारे महामंडळ रिक्त पदे स्थिती
वर्ग पदे कार्यरत रिक्त
अ ३३५ २१३ १२२
ब ११७३ ६१३५६०
क ५९५८ २१४७३८११
ड १८९१ ७४५११४६
एकूण ९३५७ ३७१८५६३९

बातम्या आणखी आहेत...