आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारमजान महिन्यात इफ्तारला खजूर खाऊन रोजा सोडला जातो. यामुळे पेंडखजूरची विक्रमी विक्री होते. मागील दोन वर्षे लॉकडाऊन, कोरोनामुळे आखाती देशातून खजूर आले नव्हते. यंदा मात्र ६० पेक्षा जास्त प्रकारचे आणि अगदी ५५ रुपये ते १४०० रुपये प्रतिकिलोपर्यंत खजूर बाजारात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी किमान सहा कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल पेंडखजूर व्यवसायात होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मागील दोन वर्षांपासून कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्वच सण निर्बंधात साजरे करावे लागत होते. दोन्ही लॉकडाऊनच्या काळात रमजान महिना आला होता. त्यामुळे बाजारपेठेत फार कमी प्रमाणात खजूर विक्रीसाठी आले होते. आता निर्बंध शिथिल झाल्याने विविध प्रकारचे खजूर शहरातील दुकानांमध्ये मिळत आहेत. यंदा किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. किमिया, सुलतान, सुकारी या खजूरची सर्वात जास्त विक्री होते. त्यानंतर अजवा, कलमी, मशरूख, सगाई, रूतबा, मशरूम, अंबर, मिडजॉल, सुककरी, इराणी खजूरला पसंती दिली जाते. सोदी अरेबिया, इराण येथील खजूरला अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विविध साठ पेक्षा अधिक प्रकारच्या खजूरची किंमत किमान ५५ रुपये किलो ते चौदाशे रुपयांपर्यंत आहे.
शहरातील सर्व दुकानांमध्ये उपलब्ध
मुख्यता रमजान महिन्यात खजूरची सर्वात जास्त खरेदी-विक्री होते. पेंडखजूर सर्वच समाजाचे नागरिक खरेदी करतात. त्यामुळे ते मॉल, किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात. रोशन गेट, शहागंज, सिटी चौक, बुढीलेन या भागांत दुकानांसह हातगाड्यांवरही खजूर विक्री होत आहेत.
या वर्षी चांगला व्यवसाय होणार
मागील दोन वर्षांपेक्षा यंदा व्यवसाय चांगला आहे. ठोक व्यापाऱ्यांसह थेट माल आणून विकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रमजानमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. - संजय पगारिया, व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.