आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठवाड्यात उभारले जाणार 60 जलप्रकल्प; बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात प्रकल्प राबवणार

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात मध्य गोदावरी खोऱ्यात १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा वापरता येणार आहे. यापूर्वी २.८० टीएमसीच्या पाणी उपलब्धतेसाठी मेरीने अहवाल दिला होता. आता १९.२९ टीएमसी पाण्याच्या मान्यतेमुळे माजलगाव धरणाच्या साठ्याएवढे पाणी परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साधारण साठ नवीन छोटे प्रकल्प चार जिल्ह्यांत उभारले जाणार आहेत. त्यामुळे साधारण ७० ते ८० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी याचा लाभ होणार आहे.

काय आहे मूळ प्रकरण?
६ ऑक्टोबर १९७५ रोजी गोदावरी लवादाने निर्णय घेतला होता. त्यामध्ये मराठवाड्याला ६० टीएमसी पाणी मंजूर झाले होते. तसेच पूर्वीचे असलेले ४२ टीएमसीचे प्रकल्प अशा १०२ टीएमसीची पाण्याला मंजुरी मिळाली होती. मात्र लवादानुसार मध्य गोदावरी खोऱ्यातील ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा एकूण पाणी वापर निश्चित करताना माजलगाव प्रकल्पास २१ मे १९७४ ची प्रशासकीय मान्यता असताना हा प्रकल्प ६-१०-१९७५ नंतरचा नवीन प्रकल्प गृहीत धरल्यामुळे पूर्वी परिगणित केलेल्या १०२ टीएमसी

मराठवाड्यासाठी फायद्याचा
या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे १९.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यासाठी हा निर्णय अतिशय फायद्याचा आहे. लेंडी, लोणीसावंगी, सिद्धेश्वर,निम्न दुधना या प्रकल्पांतर्गत तसेच सुधा खोरे उपखोरेअंतर्गत हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. - एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा

निर्णय चांगला, मात्र १६८ टीएमसीबाबत निर्णय व्हावा
मध्य गोदावरी खोऱ्यातला अतिरिक्त पाणीसाठ्याचा निर्णय चांगला आहे. मात्र मराठवाड्याला १६८ टीएमसी पाणी देण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला जात नाही. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता होईल. -शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ

या आहेत अटी
- हे प्रकल्प व पाणीसाठा वापर करताना अटी-नियमांचे पालन करावे लागेल.
- एकात्मिक राज्य जल आराखाड्यात आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची दक्षता घ्यावी लागेल.
- या अतिरिक्त पाण्यातून अस्तित्वातील धरणाच्या ऊर्ध्व बाजूस कोणताही नवीन प्रकल्प घेतला जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...