आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी-लेखकांशी संवाद:600 विद्यार्थ्यांनी साधला आवडत्या कवीशी संवाद

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाठ्यपुस्तकासह आपल्या आसपास असलेल्या कवी-लेखकांशी संवाद साधता यावा, त्यांच्या लेखनाविषयीची जडणघडण समजून घेता यावी या उद्देशाने शाळांमध्ये परीसस्पर्श उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राजे संभाजी विद्यालयात ६०० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कारप्राप्त शेतीमातीकार कवी अशोक गायकवाड यांच्याशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी कविता कशी सुचते, तुम्हाला का लिहावंसं वाटलं, या प्रश्नांनी संवादाला सुरुवात केली.

इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी अश्विनी तांदळे हिने कवी गायकवाड यांचा जीवनप्रवास प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांसमोर विविध साहित्यकृतींचे सादरीकरण केले. त्यांनी “माझी शाळा माझा दिवस’ या अनुषंगाने कथेचे तसेच कवितेचे सादरीकरणही केले. कविता कशी लिहावी, तिचे घटक, कवितेचे विषय, कवितेसाठी निरीक्षणशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, लिहिण्यासाठीचे बारकावे विद्यार्थ्यांसमोर मांडले. या प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रवी जाधव, शाळेचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...