आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुप्रतिक्षित लस अखेर दाखल:​​​​​​​कोरोनाच्या 60 हजार लसी औरंगाबादेत दाखल, चार जिल्ह्यांचा साठा उतरवला

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्याहून लसी पहाटे ५ वाजता व्हाकसिन व्हॅन निघाली.

मागील ९ महिन्यांपासून कोरोनाशी कडवी झुंज दिली जात आहे. अखेर बुधवारी(१३ जानेवारी) सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी कोरोनाच्या ६० हजार लसी दाखल झाल्या.

सिडको एन ५ येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात, औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ जिल्ह्याचा साठा उतरविण्यात आला. येथून जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीचा साठा आजच पाठवला जाणार आहे. डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, चारही जिल्ह्यात आजच लस रवाना करण्याची सोय आम्ही केली आहे.

पुण्याहून लसी पहाटे ५ वाजता व्हॅक्सीन व्हॅन निघाली. सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी पोहोचली. वाहन चालक संजय चाबुकस्वार आणि आरोग्य पर्यवेक्षक शेखर आनंदे यावेळी सोबत होते. चाबुकस्वार म्हणाले, पुण्याहून विविध लसी आम्ही नियमित औरंगाबाद ला आणत असतो. कोरोणची लस आणताना विशेष आनंद आहे. कारण हजारो परिवार या आजाराने उध्वस्त केले आहेत. यापुढे कुणाचा जीव जाणार नाही. शेखर म्हणाले, पुण्याहून चार तासात लस औरंगाबाद मध्ये आणली.

बातम्या आणखी आहेत...