आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62% विरोधी आमदारांचे अधिवेशनात ‘प्रश्न’च नाही:विधानसभेत राष्ट्रवादी, काँग्रेस, उध्‍दव ठाकरे यांच्या सेनेचे अत्‍यल्‍प प्रश्‍न

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तांतर झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील सत्ताधारी आणि विरोधकांचा राडा या अधिवेशनाने अनुभवला. मात्र, विधिमंडळाच्या सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी या आमदारांनी गमावली. गेला आठवडाभर चाललेल्या या पावसाळी अधिवेशनात एकूण 218 प्रश्न पटलावर मांडण्यात आले. मात्र, सर्वपक्षीय 154 आमदारांनी एकही लेखी प्रश्न विचारण्याची तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपच्या सर्वाधिक आमदारांनी प्रश्न विचारले. विरोधी बाकावर बसणाऱ्या 62 टक्के आमदारांनी एकही प्रश्न विचारला नाही. 17 ऑगस्टपासून विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रश्नांचे "दिव्य मराठी'ने केलेले विश्लेषण पुढीलप्रमाणे...

सर्वपक्षीय 154 आमदारांकडून प्रश्न नाही
राज्यातील ज्वलंत प्रश्न, मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, विकासकामांतील अडथळे याबाबत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तर देणे बंधनकारक असते. किंबहुना, सभागृहातील प्रश्नोत्तरांत मांडलेेले प्रश्न व त्यावर मंत्र्यांनी दिलेली उत्तरे मतदारसंघाचा विकास व महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णायक ठरतात. मात्र, या अधिवेशनात सर्वपक्षीय तब्बल 154 आमदारांनी एकही लेखी प्रश्न विचारला नाही.

विरोधकांना जनतेचा आवाज म्हटले जाते. सध्या विरोधी बाकांवर शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस व राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष असताना, लेखी प्रश्नांमध्ये त्यांचे प्रमाण 38% होते. शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तब्बल एकूण 62% आमदारांनी एकही प्रश्न विचारला नाही. शिंदेसेना : सत्ता येताच 29 आमदारांचे ‘प्रश्न’ संपले! : मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळत नाही, अशी ओरड करीत शिवसेनेतून बंड करणाऱ्या व एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या 29 आमदारांनी अधिवेशनात एकही प्रश्न विचारला नाही. शिंदे गटात 48 आमदार आहेत. त्यापैकी फक्त 40 टक्के म्हणजे 19 आमदारांनी लेखी प्रश्न विचारले व 29 आमदारांनी गप्प बसणे पसंत केले.

राष्ट्रवादी : 77% आमदार : राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 13 माजी मंत्री आहेत. मात्र, त्यांनी एकही लेखी प्रश्न विचारला नाही. 53 आमदारांपैकी 41 म्हणजे 77% आमदारांनी विधानसभेत एकही लेखी प्रश्न मांडला नाही.
काँग्रेस: 60% आमदार : सर्वाधिक माजी मुख्यमंत्री व 10 माजी मंत्री असलेल्या काँग्रेसच्या 44 आमदारांपैकी फक्त 18 आमदारांनीच लेेखी प्रश्न दिले. बाकीच्या 26 आमदारांनी एकही प्रश्न विचारला नाही.

बातम्या आणखी आहेत...