आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी वर्ग 1 व 2 च्या भरतीत 161 जागांची भर:462 ऐवजी 623 जागा भरणार, जागा वाढवल्याबाबत काढले शुद्धीपत्रक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एमपीएससीमार्फत वर्ग-1 आणि वर्ग-2 अधिकारी पदांच्या भरतीत 161 जागांची भर पडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने 462 जागा भरण्याचे निश्चित केले होते. आता ही भरती 623 जागांसाठी होईल. त्यात सर्वाधिक 139 जागा उप-शिक्षणाधिकाऱ्यांच्या आहेत.

उप-जिल्हाधिकारी-33 तर पोलिस अधिकाऱ्यांच्या 41 जागा आहेत. 21 ऑगस्ट रोजी पुर्व परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेनंतर एप्रिल- 2023 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे आयोगाने कळवले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 मे 2022 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात ऑगस्ट-2022 दरम्यान गट-अ आणि गट-ब या संवर्गातील 462 जागांची भरती केली जाणार होती. पण आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात 31 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा दुरूस्तीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची 33 पदे असून महिलांसाठी 10 राखीव आहेत.

खेळाडूसाठी एक जागा राखीव आहे. पोलिस उप-अधीक्षक किंवा सहायक पोलिस आयुक्तांची 41 जागा आहेत. त्यापैकी 29 पुरूष तर 12 महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. जीएसटी विभागाचे सहायक आयुक्तांचे 47 जागा आहेत. त्यात 31 जागा पुरूष तर 15 महिलांची आहेत. तहसिलदारांच्या 25 जागा असून 17 पुरूष तर 7 जागा महिलाांसाठी आहेत.

उप-शिक्षणाधिकाऱ्यांचे 139 जागा आहेत. त्यात 92 पुरूष तर 39 जागांवर स्त्रीयांना संधी दिली जाणार आहे. खेळाडुंसाठी 8 जागा आहेत. स्कुल इंन्सपेक्टरच्या 88 जागा आहेत. त्यामध्ये 55 पुरूष, 29 महिलांचा समावेश असून 4 खेळाडूंना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.

गटविकास अधिकारी पदाच्या 14 जागा असून 9 पुरूष तर 5 स्त्रियांना संधी दिली जाईल. सहायक गटविकास अधिकारीसाठीही 80 जागा आहेत. त्यापैकी 53 पुरूषांना तर 24 जागी महिलांना सामावून घेतले जाणार आहे. खेळाडुंना 3 जागांवर आरक्षण आहे.

सीडीपीओच्य 28 तर मुख्याधिकाऱ्यांच्या 22 जागा-

बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजेच सीडीपीओच्या 28 जागा असून 18 पुरूष तर 9 स्त्रीया तर 1 जागेवर खेळाडुंना संधी दिली जाणार आहे. प्रकल्प अधिकारी-6, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-4, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील कक्षाधिकारी-4, मंत्रालयातील कक्षाधिकारी-5, भुमी अभिलेख विभागात उप-अधीक्षक-3, सहायक निबंधक सहकारी संस्था-2, राज्य उत्पादन शुल्क विभागातील उप-अधीक्षक आणि सहायक आयुक्तांची प्रत्येकी 3 जागा भरण्यात येणार आहे.

सहायक प्रकल्प अधिकारी-42 जागा भरण्यात येतील. त्यामध्ये 27 पुरूष तर 13 महिला आहेत. 2 जागांवर खेळाडुंना संधी दिली जाईल. पुर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली गेली आहे. या सर्व जागांसाठी सामाजिक आरक्षणाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...