आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील ६४२ शिक्षक चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची अंतिम यादी १ जून रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली, तर ३६ शिक्षकांचे प्रस्ताव निकषात बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी सेवेची १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रस्ताव ९ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्याची पडताळणी झाली असून जिल्ह्यातील ६४२ शिक्षक पात्र ठरले आहेत. यात ५६४ सहशिक्षक, ३७ मुख्याध्यापक, १३ केंद्रप्रमुख, १८ माध्यमिक शिक्षक, ७ प्राथमिक पदवीधर शिक्षक, २ चित्रकला शिक्षक, २ शारीरिक शिक्षक यांचा समावेश आहे. याप्रश्नी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने पाठपुरावा केला होता, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी सांगितले.
पात्र शिक्षकांची संख्या वैजापूर - १४७, पैठण - ९९, कन्नड - ९१, सिल्लोड - ८०, गंगापूर - ७०, औरंगाबाद - ५०, फुलंब्री - ४४, खुलताबाद- ४०, सोयगाव - २१.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.