आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यारंभ:पावसाळ्याच्या तोंडावर सुरू हाेणार 100 कोटींच्या 65 रस्त्यांची कामे, गुणवत्ता कायम ठेवण्याचे मनपासमोर आव्हान

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना अखेर मुहूर्त लागला आहे. या आठ दिवसांत कामाला सुरुवात हाेण्याची शक्यता अाहे. मनपाने शहरातील ६५ रस्त्यांसाठी मागवलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला. तीन पॅकेजमधील निविदा उघडण्यात येऊन कंत्राटदार अंतिम करण्यात आले. या कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी दोन दिवसांत प्रशासकांकडून मंजुरी दिली जाणार आहे.

महापालिकेने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी शंभर कोटींची तरतूद केली हाेती. त्यानुसार बांधकाम विभागाने ६५ रस्त्यांच्या कामासाठी ई-निविदा मागवल्या होत्या. रस्त्यांसाठी २५ कोटींचे पॅकेज तयार केले होते. त्यात ए-पॅकेजसाठी समृद्ध कन्स्ट्रक्शन, सी-पॅकेजसाठी जे. पी. कन्स्ट्रक्शन आणि डी पॅकेजसाठी आर. के. चव्हाण यांच्या निविदा अंतिम करून त्यास प्रशासकांची मान्यता घेण्यासाठी संचिका सादर केली.

सोमवारी किंवा मंगळवारी निविदांना मान्यता मिळताच एजन्सीला पत्र देऊन एक टक्का अनामत रक्कम भरण्यासाठी सांगण्यात येईल. बी-पॅकेजसाठी फेरनिविदा केली असून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निविदांची तांत्रिक आणि आर्थिक बिडची तपासणी करून ही निविदादेखील अंतिम केली जाणार आहे.

लवकरच कार्यारंभ आदेश

शंभर कोटींच्या तीन पॅकेजच्या निविदा अंतिम करून कार्यारंभ आदेश देण्यासाठी प्रशासकांकडे पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत मंजुरी मिळताच कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही सुरू हाेईल.

- ए. बी. देशमुख, शहर अभियंता मनपा

गुणवत्तेचे काय ॽ

ज्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होतील त्या भागाची चांगली सोय होईल. मात्र पावसाळ्यात ज्या रस्त्यांची कामे सुरू राहतील त्यांची गुणवत्ता कायम ठेवण्याचे आव्हान मनपा आणि ठेकेदारासमोर आहे.