आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीचे नूतनीकरण:आचारसंहितेमुळे रखडलेली महापालिकेची 650 कोटींची विकासकामे मार्गी लागणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे आता शहरात ६५० कोटींची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात १९३ काेटींतून जुन्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण, २७५ काेटींचा सातारा-देवळाई ड्रेनेज प्रकल्प, १०० काेटींचे रस्ते अशा प्रमुख कामांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेल्या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. अमृत-२ मध्ये समावेश झालेल्या २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जुन्या पाणी योजनेच्या बळकटीकरण, ३ काेटींतून कमल तलावाचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण, सातारा-देवळाईसाठी ड्रेनेज प्रकल्प या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. तसेच नारेगाव, चिकलठाणा, पडेगाव येथील कचरा डेपोवर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठी ७५ कोटींचा प्रस्ताव सादर झाला आहे. १०० कोटींच्या रस्ते कामांची निविदा, आरोग्य मिशनअंतर्गत १० कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी ६५६ कोटींची कामे लवकर मार्गी लागणार आहेत.

मेल्ट्रॉनची नोकर भरती होणार आचारसंहितेमुळे मेल्ट्रॉन हॉस्पिटलसाठी कर्मचारी भरतीचे काम थांबले होते. आता ९६ जणांची भरती हाेईल. यात डॉक्टर, परिचारक, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय गेल्या वर्षभरापासून रखडलेले मनपाच्या आदर्श शिक्षकांचे पुरस्कार दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...