आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी गुरुवारी (२ फेब्रुवारी) चार विभागांत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात २१९ जणांनी सहभाग घेतला. सुट्या वगळता ४ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंतच्या २६ दिवसांत ११ शैक्षणिक विभागांच्या ६५० जणांना ‘ट्रेनिंग’ दिले आहे. तिसऱ्या आठवड्यात पाच विभागांच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जाईल.
विद्यापीठाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि इंटर्नल क्वालिटी अॅश्युरन्स सेल अर्थात आयक्वॅक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बार्कलेज लाइफ स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम’ या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीच्या प्रचलित पद्धतीत सर्व शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांना मुख्य सभागृहात बोलावून प्रशिक्षण दिले जात असे. आंतरराष्ट्रीय बँक ‘बार्कलेज’ने विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्रेनिंग सुरू केले आहे. बँकेने ट्रेनरचा सर्व खर्च उचलला आहे. पुण्याच्या रुबिकॉन स्किल फाउंडेशनचे ट्रेनर त्यासाठी परिश्रम घेत आहेत.
४ जानेवारीपासून विभागनिहाय विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. गुरुवारी पाली अँड बुद्धिझम तसेच उर्दू विभागातील ८० विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यात आले. हिंदीच्या ६४, तर एमएसडब्ल्यूच्या ७५ जणांचेही ट्रेनिंग सुरू झाले आहे. गुरुवारी २१९ जणांचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. मागील २६ दिवसांत ११ शैक्षणिक विभागातील ६५० विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले आहे. व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीची रीत आणि त्याचे तंत्र, रिझ्युमे प्रिपरेशन, संवाद कौशल्य, स्वत:ला प्रेझेंट करण्याचे कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जात आहे. आयक्वॅकचे संचालक एन. एन. बंदेला आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीश काळे काम करत आहेत.
मार्च-एप्रिलपर्यंत प्रशिक्षण
२६ दिवसांत व्यवस्थापनशास्त्र विभाग, दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र, अर्थशास्त्र, विधी, जैवरसायन, उर्दू, पाली अँड बुद्धिझम, हिंदी, एमएसडब्ल्यू, ग्रंथालय व माहितीशास्त्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात कार्यशाळा झाली आहे. आता फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लोकप्रशासनशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जाणार आहे.
याचे फायदे नक्की दिसतील
रुबिकॉनचे ट्रेनर व्यावसायिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे सेशन घेत आहेत. सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लियर करणे, त्यांच्यातील सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण खूप उपयोगी होत आहे. सर्व विभागांतील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ट्रेन करू. नजीकच्या काळात याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसतील.- डॉ. गिरीश काळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.