आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाला दिलासा:शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्यासाठी राज्य-केंद्राला भरावे लागतील 653 कोटी

प्रवीण ब्रह्मपूरकर : औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी ६५४ कोटी रुपये भरले. पण विमा कंपन्या भरपाई देत नसल्याच्या हजारो तक्रारी असतात. एवढी मोठी रक्कम भरूनही फायदा होत नसल्याचे दिसते. यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने एक रुपयांत पीक विम्याची योजना आखली आहे. त्यात शेतकऱ्यांना फक्त १ रुपये भरावा लागेल. त्यांच्या वाट्याची उर्वरित म्हणजे सुमारे ६५३ कोटी रुपये राज्य, केंद्र सरकार देईल, अशी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल सातत्याने वाद सुरू आहे. शेतकऱ्यांवरील बोजा कमी करण्यासाठी कृषी अभ्यासक काही उपाययोजना सुचवत आहे. एक रुपयात पीक विमा त्या उपायातील एक भाग आहे. सध्या शेतकरी दोन टक्के रक्कम भरतात. उर्वरित ९८ टक्के केंद्र व राज्य सरकार देते. महाराष्ट्रात या वर्षी ९६ लाख ४४ हजार ९१३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. ६५४ कोटी २९ लाख रुपये भरले. त्याच्या हप्त्यापोटी ४४०७ कोटी रुपये जमा झाले. राज्य सरकारच्या वाट्याचे १८७८ कोटी २६ लाख तर केंद्राच्या वाट्याचे १८७५ कोटी २१ लाख रुपये आहेत.

विमा योजनेमुळे राज्यातील सर्व दीड कोटी शेतकऱ्यांना मिळेल लाभ काय आहे सत्तारांचा प्रस्ताव कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना केवळ एक रुपया आणि सातबाऱ्याची प्रत द्यायची आहे. त्याच्या वाट्याच्या विमा रकमेचा भार केंद्र व राज्य सरकार उचलेल.

सर्व शेतकऱ्यांना मिळेल गेल्या वर्षी ८४ लाख सात हजार ३२८ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यंदा हा आकडा ९६ लाख झाला. राज्यात एक कोटी ५३ लाख शेतकरी आहेत. विम्याचा वाढता खर्च आणि भरपाई मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड यामुळे अनेकजण विमा काढत नाहीत. परंतु, एक रुपयात विमा योजना सुरू केली तर उर्वरित ५० लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल. कृषी अभ्यासक गोविंद जोशी यांनी सांगितले की, एक रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.

विमा काढणारे सर्वाधिक शेतकरी मराठवाड्यातून विमा काढणाऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी मराठवाड्यातील आहेत. त्यांचे जिल्हा, विभागनिहाय आकडे असे. औरंगाबाद - ७४६६५९, जालना - ७५०४८४, बीड - १६५६९०३. लातूर - ८२८६७१, उस्मानाबाद - ६७२१५४ नांदेड - १०६७१५२, परभणी - ६७१३४२, हिंगोली - ३८७९७५. ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी - ८७४००. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव - ४३१४६०. अहमदनगर, पुणे, सोलापूर- ४२७८८२. सातारा, सांगली, कोल्हापूर - ३५०८८. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ - १५८७७८२. वर्धा, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली - २९६६६१

बातम्या आणखी आहेत...