आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण संस्था:आयटीआयचे चौथ्या फेरीत 66.12 % प्रवेश ; रिक्त जागांवर समुपदेशन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी चौथ्या फेरीच्या शेवटच्या दिवशी ६६.१२ टक्के प्रवेश निश्चित झाल्याची माहिती औरंगाबाद आयटीआयच्या वतीने देण्यात आली. २९ ऑगस्ट रोजी समुपदेशनाद्वारे भरण्यात येणाऱ्या जागांसाठीची यादीही जाहीर करण्यात येणार आहे.

औरंगाबाद आयटीआयत ११०४ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी शनिवारी ७३० जणांनी प्रवेश निश्चित केले. आता २९ ऑगस्ट रोजी संस्थास्तरावरील समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येणाऱ्या जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या रिक्त जागांवर समुपदेशन फेरीसाठी ३० व ३१ ऑगस्ट रोजी नोंदणी करता येईल. १ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर हाेईल. २ सप्टेंबर रोजी प्रवेशासाठीच्या जागांचे वाटप होईल. ५ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसह प्रवेशासाठी प्रत्यक्ष हजर राहायचे आहे, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...