आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:माय एफएमकडून महाराष्ट्रातील 67 व्यावसायिकांचा सिंगापूर येथे गाैरव

सिंगापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय एफएमकडून नुकतेच सिंगापूर येथे रंगतदार व नेत्रदीपक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. निमित्त हाेते द अचीव्हर्स अवॉर्ड २०२२ साेहळ्याचे. या वेळी महाराष्ट्रातील ६७ व्यावसायिकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गाैरव करण्यात आला. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. माय एफएम नेहमीच आपल्या कार्यातून विविधतेचे दर्शन घडवत आले आहे. त्यात विविध व्यावसायिक, डॉक्टर, महिलांसाठी उपक्रम राबवण्यात येतात. या साेहळ्याच्या निमित्ताने समाजाेपयाेगी उपक्रम सातासमुद्रापार नेणारे माय एफएम पहिले रेडिअो स्टेशन ठरले आहे. या साेहळ्यात विविध मान्यवरांना द अचीव्हर्स अवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आले. या दिमाखदार साेहळ्यात जळगाव येथील अभिलाष नागला, मनीष अग्रवाल, डॉ. अंकुर झंवर, डॉ सुनील दत्त चौधरी यांना गाैरवण्यात आले. औरंगाबाद येथील सुमित्रा गावंडे आणि सुरेश गावंडे, गौतम जैन आणि ममता जैन, डॉ. आशिष झिंजुर्डे पाटील, प्रवीण ठाकूर आणि कविता ठाकूर, डॉ. मिराज काद्री, गणेश काटे , मोहंमद रियाज कादर, सविता अधाने आणि पवन अधाने, डॉ. श्रद्धा गादिया (रुणवाल), सुभाष मुदगडकर आणि मनीषा मुदगडकर, डॉ. विजय चाटोरीकर आणि वृषाली चाटोरीकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर, सांगली येथील गाैरवमूर्तींमध्ये डॉ. राजन कामत आणि डॉ. रंजना कामत, डॉ. गणेश यमगार आणी डॉ. अर्चना यमगार, विनायक पाटील, डॉ. तुषार धोपडे आणि डॉ. योगेश एडगे यांचा समावेश हाेता.

सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

{नाशिक येथील गाैरवमूर्ती : पराग शहा आणि हिना शहा, डॉ. हनुमंत बांगर आणि डॉ. अनिता बांगर, शिवाजी डोळे, डॉ कृष्णा यादव आणि सुशील तांबे, नचिकेत लवाते, जयेश विजयकुमार बाफना, प्रमोदकुमार मुर्केवार, वैष्णवी इलेक्ट्रिक्सचा संघ, राहुल शहा, डॉ. गौरव गुजराती, योगेश बेदमुथा आणि मुकुंद साबू, कौशिक कोठिया, भाविक ठक्कर, डॉ. सायली पाटील जगताप, जिनेंद्र शहा, शशिकांत जाधव आणि शंतनू जाधव, वासुदेव ललवाणी, हितेश बाबरिया, आतीष शहा, विपुल नेरकर, विराज शहा आणि करण शहा, तेज टकले, विजय गोसावी, योगेश वाळे आणि नितीन सोनावणे, मसूद आज़ादी आणि पर्ल मोतीवाला, नीलम शौकतरमाणी, सुशांत पाटील आणि राज नाहर, अंजान भलोदिया. { सोलापूरचे सत्कारमूर्ती : प्रवीण कसपटे, जयेश संगा, विजय राघोजी. { अहमदनगरचे सत्कारमूर्ती : राजेश भंडारी, डॉ. ईश्वर कानसे आणि डॉ सोनाली कानसे, डॉ. भूषण निकम आणि डॉ. सोनल निकम, सुनील माहेश्वरी, के. बालराजू, मनीश ठुबे, अमित पोखरणा आणि पूजा पोखरणा, कडूभाऊ काळे आणि संघ. { धुळे : राहुल जाधव, सागर पाटील आणि केदार पाठक, विजयकुमार रामदास ढोबळे.

बातम्या आणखी आहेत...