आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगदिनी 7 कारखान्यांतील कामगारांशी संवाद:670 कर्मचाऱ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरातील ७ कारखान्यांमध्ये ६७० कामगारांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. जागतिक कर्करोग दिनानिमित्त सलील पेंडसे यांनी मार्गदर्शन केले. पेंडसे म्हणाले, धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या तंबाखूपासून लांब राहणे गरजेचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन २३ कामगारांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन तंबाखूचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची होळी केली.

जागतिक कॅन्सर दिनानिमित्त वाळूज येथील गणेश प्रेसिंग अँड टूल, दिग्विजय इंजस्ट्रीज, बीकेटी टायर्स, श्री गणेश प्रेसिंग, चंद्रा इलेक्ट्रिकल आदी कारखान्यांतील कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

आजार, आर्थिक नुकसान दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट यामुळे शारीरिक नुकसान तर होतेच, पण आर्थिक हानीही होते. लहान वयातच कामगारांना बीपी, शुगर, किडनीचे आजार, फुप्फुसांचे आजार होत आहेत. त्यामुळे व्यसन सोडण्यासोबतच आहार आणि व्यायाम यावर लक्ष द्या, असे आवाहन पंेडसे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...