आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयात ६८ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार असून निविदेचा मसुदा तयार केला असून प्रशासकांची मान्यता मिळताच ती प्रसिद्ध केली जाणार अाहे. मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी ही माहिती दिली.शहरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने चिकलठाणा एमआयडीसीमधील मेल्ट्रॉन कंपनीची इमारत महापालिकेला कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीनशे बेड उपलब्ध करून दिल्यानंतर कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नऊ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरचे रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे.
मेल्ट्रॉनमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहते. हे मेल्ट्रॉन रुग्णालय म्हणून सुरू करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतला आहे. त्यानुसार मेल्ट्रॉनसाठी लागणाऱ्या ६८ पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.निविदेचा मसुदा तयार करून तो मान्यतेसाठी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
एनयूएचएमअंतर्गत ४९ पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात महापालिकेने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत ४९ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून त्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. या पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी सात अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. समितीकडून सर्व प्रकारची तपासणी झाल्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. एप्रिलअखेरीस ४९ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.