आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनुसूचित जातींमध्ये ५९ जातींचा समावेश असून, यात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर मातंग समाज येतो. मातंग समाजाच्या विकासासाठी ८२ शिफारशींपैकी ६८ शिफारशी मंजूर केलेल्या असतानाही एकाही शिफारशीची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे वेगळ्या आरक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत अॅड. अंगद कानडे यांनी व्यक्त केले. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात मातंग समाज राज्यस्तरीय मेळावा, समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार, तसेच निर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे, प्रमुख वक्ते अॅड. अंगद कानडे, प्रा. संजय सांभाळकर, महिला अध्यक्षा सुवर्णा साबळे आदींची उपस्थिती होती. अॅड. कानडे म्हणाले की, ७५ वर्षे उलटली तरी मातंग समाजात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्टीने विचार केलेला नाही. अनुसूचित जाती प्रवर्गात मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असताना मातंग समाज अन्न, वस्त्र, निवारा याभोवती भटकत आहे. समाजाच्या विकासासाठी मंजूर केलेल्या शिफारशींची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
मंजूर केलेले प्रमुख ठराव राज्यस्तरीय मेळाव्यात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावामुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावेअनुसूचित जातीची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ स्थापन करण्यात यावीलहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यातमहाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करावे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.