आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाॅरियर फेन्सिंग क्लब व जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित सहाव्या वॉरियर तलवारबाजी लीग स्पर्धेत वाॅरियर संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेेतेपद पटकावले. शिवनेरी संघाने उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेत श्रीजा घुले, साईराज लहाने, मानक जाधव, स्वामींनी डोंगरे आदींनी आपापल्या गटात शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेत 4 संघांतर्फे 120 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजेत्या खेळाडूंना ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उद्योजक मिलिंद पाटील, डॉ. मयूर सोनवणे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश वंजारे यांनी केले, तर आभार आयोजन समिती सचिव प्रा. सागर मगरे यांनी मानले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
इप्पी 12 वर्षे मुली - श्रीजा घुले, शिवनेरी (सुवर्ण), सौम्या साठे, वाॅरियार (रौप्य), आर्या गोरे, रायगड (कांस्य), संतोषी पाटील, शिवनेरी (कांस्य). मुले - साईराज लहाने, अमेय गोरे, निखिल आव्हाड, वरद जाधव. फॉईल प्रकार - स्वामींनी डोंगरे, वैष्णवी कावळे, उमा डोंगरे, स्वरा शेळके. मुले - यशराज निंभोरे, समर्थ डोंगरे, देवेन पाथ्रीकर, रुद्र थोटे. सेबर प्रकार - भक्ती सोनवणे, श्रेया मोईम, स्वरा वानखेडे. मुले - मानक जाधव, सन्मय क्षीरसागर, सत्यजित कामठे, वेदांत काळे. १४ वर्ष इप्पी मुली - मानसी जाधव, अदिती साळवे, आरुषी सपकाळ, अदिती अंभोरे.
मुले - ओम लहाने, आर्यन काकड, साई जाधव, पार्थ पतंगे. फॉईल - कनक भोजने, अनुष्का अंकमुळे, यशश्री वंजारे, मानसी हुलसुरकर. मुले - अर्जुन सोनवणे, कार्तिक चटप, हर्षवर्धन भांबरे, स्वराज डोंगरे. सेबर - हर्षदा झोन्ड, तनुजा लहाने, ऋतुजा मनमोडे, राजनंदिनी तवार. स्पर्श जाधव, ऋषिकेश सोनार, श्रेयस जाधव, रुजल वनारसे.
18 वर्ष इप्पी मुले - यश वाघ, अभिषेक चटत, अभिषेक डोंगरे, अभिजीत बोर्डे. मुली - गायत्री कदम, गायत्री डोंगरे, सपना मगरे, आदिती मोरे. फाॅईल प्रकार - तेजस पाटील, रोहन शहा, ओम वाघ, नरेश वंजारे. मुली- वैदेही लोहिया, गायत्री गोटे, माही गाढवे, वैष्णवी दुसांगे. सेबर - आदित्य वाहुळ, शिवम पाटील, सत्यम पाटील, मयूर मावळ. मुली - कशिष भराड, प्रेरणा जाधव, अक्षता भवंगे, मैत्री तलवंडे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.