आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहावी वॉरियर फेन्सिंग लीग:वरद, तनुजा, यशश्री, श्रीजा, स्वामींनीची विजयी सलामी, तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार; प्रमोद येवले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी नगर तलवाबाजी संघटना व वॉरियर फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक महाविद्यालय, सिडको येथे आयोजित सहाव्या वॉरियर फेन्सिंग लीग स्पर्धेत वरद जाधव, तनुजा लहाने, यशश्री वंजारे, श्रीजा घुले, स्वामींनी डोंगरे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली.

या स्पर्धेत रायगड फेन्सर्स, शिवनेरी फेन्सर्स, देवगिरी फेन्सर्स व वॉरियर फेन्सर्स असे चार संघात संघर्ष पहायला मिळेल. यात १२, १४ व १८ वर्षाखालील एकूण १२० खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रथम खेळाडूंनी मान्यवरांना पथसंचलन करत मानवंदना दिली. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यापीठात अद्यावत तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न : डॉ.प्रमोद येवले

तलवारबाजी खेळातील प्रगती, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेतील यश तसेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेतील खेळाडूंची नेत्रदीप कामगिरी पाहता तलवारबाजी खेळाडूंसाठी सर्वत्र मदत करणार आहोत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तलवारबाजीचे अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटले.

याप्रसंगी विद्यापीठातील विविध प्राधिकरणावर निवडून आलेल्या व नामनिर्देशित झालेल्या मान्यवरांचा सत्कार कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये डॉ. गजानन सानप (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य), काशिनाथ देवधर, डॉ. अंकुश कदम, बसवराज मंगरुळे, प्राचार्य डॉ. भरत खंडारे, डॉ. योगिता होके पाटील, डॉ. गौतम पाटील, डॉ. रवी किरण सावंत, दत्ता भांगे, नितीन जाधव, अधीसभा सदस्य गणेश खैरे, मनोज शेवाळे, पूनम पाटील, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. विक्रम खिल्लारे, बंडू सोमवंशी आदींचे सत्कार झाले.

पहिल्या फेरीचे निकाल

१२ वर्षे इप्पी मुले - वरद जाधवने अमेय गोरेला ६-१, साईराज बलांदेने आरव जाधवला ५-० गुणांनी मात दिली. मुली - श्रीजा घुलेने सौम्या साठेला ३-४ ने हरवले. फाॅईल - यशराज निभोरे वि.वि. देवेने पाथ्रीकर ५-३, समर्थ डोंगरे वि.वि. नयन थोटे ५-२. मुली - स्वामींनी डोंगरे वि.वि. वैष्णवी कावळे ५-३. सेबर प्रकार - भक्ती सोनवणे वि.वि. श्रेया मोईम ५-१. १४ वर्ष फॉईल मुली - यशश्री वंजारे वि.वि. कनक भोजने ५-४.