आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषारोपपत्र दाखल:महिलेचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीस 7 महिने कारावास

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेत चढणाऱ्या महिला प्रवाशाचा मोबाइल चोरणाऱ्यास सात महिने चार दिवसांचा साधा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. मोताळे यांनी ठोठावली. श्रीनिवास संतोष वारले (२३, रा. खरबळा, ता. मुधोळ, जि. तानूर, तेलंगण, ह. मु. देगलूर नाका, नांदेड) असे चोरट्याचे नाव आहे.

प्रकरणात प्रतीक्षा बाबूराव तांदळवाड यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार २५ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी आदिलाबाद पॅसेंजरने नांदेड येथून परभणी येथे जात होत्या. त्यांच्या बॅगमधून मोबाइल चोरीला गेला. पाच मिनिटांनंतर मोबाइल चोरीला गेल्याच्या निदर्शनास आले. त्यांनी नांदेड लोहमार्ग पोलिस ठाणे गाठत चोरट्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइल ट्रेसिंग करून आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिस नाईक जिवराज लव्हारे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवळी सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने वरील शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून आर. एच. राठोड यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...