आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिंबा:7 हजार पेन्शन; आरोग्यसेवेसाठी 1427 दिवसांपासून उपोषण

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील ६७ लाख पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचे सात हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन, पती-पत्नीला मोफत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी राष्ट्रीय संघर्ष कृती समितीतर्फे १४२७ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात आता पैठण तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींनी ग्रामप्रधान ते पंतप्रधान या अभियानांतर्गत एकमताने ठराव मंजूर करून पेन्शनधारकांना पाठिंबा दिला आहे.

त्यांच्या सर्व मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित मान्य कराव्यात, यासाठी ठराव पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहेत. समितीतील महिला पदाधिकारी कविता भालेराव, आशा काळे, ज्योती शर्मा यांनी तेरा ग्रामपंचायतींना भेट देऊन सरपंच, सदस्यांशी चर्चा केली व त्यांचा पाठिंबाही मिळवला. अभियानाला ग्रामपंचायतींचा पाठिंबा मिळत असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रमुख कमांडर अशोक राऊत व राज्य कार्यकारी अध्यक्ष कमलाकर पांगरकर यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...