आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:7 वर्षीय चिमुकलीचे घरात घुसून अपहरण, वासनांध आरोपीने मुलीच्या ओठाचा तोडला लचका

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: संतोष उगले
  • कॉपी लिंक

वासनांध माथेफिरूने साखरझोपेत असणाऱ्या चिमुकलीचे घरात घुसून अपहरण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, मुलगी आराओरड करत त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना वासनांध आरोपीने चक्क चिमुकलीच्या ओठांचा चावा घेत लचका तोडला. जिवघेण्या वेदनांमुळे मोठ्याने चिमुकली किंचाळली. याचवेळी आरोपीने तिला जागीच सोडून अंधाराच्या दिशेने धुम ठोकली. हा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये 15 ऑक्टोबरला मध्यरात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून सदरील काम हे कन्नड तालुक्यातील एका ठेकेदारास देण्यात आले आहे. हा ठेकेदार त्याचा भाऊ, भाऊजी व इतर आठ कामगार या ठिकाणी काम करतात. ठेकेदार व कुटूंबीयांना घरमालकाने बांधकामाच्या ठिकाणीचे पत्र्याचे शेड उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. घटनेच्या दिवशी शेडमध्ये मुलीची आजी, मुलगी व तिचे दोन मामा झोपले होते. दरम्यान 1 वाजेच्या सुमारास वासनांध माथेफिरूने बांधकामाच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या कामगारांपैकी एकाचा मोबाईल फोन लंपास केला. त्यानंतर आरोपीने आपला मोर्चा पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या चिमुकलीकडे वळवला.

आजीजवळ झोपलेल्या चिमुकलीला अलगद उचलून घेत आरोपीने धुम ठोकली. पुढे एका रिकाम्या प्लॉटमध्ये चिमुकलीला घेवून जात तिच्यावर त्याने आतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी चिमुकलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी रडण्यास सुरूवात केली. त्यावर संतापलेल्या आरोपीने तिच्या ओठांचा लचका तोडला. त्यानंतर चिमुकली जोरात ओरडली, तिच्या ओरडण्याने नागरीक येतील या भितीने आरोपीने अंधाराचा फायदा घेत धुम ठोकली.

पुढे चिमुकली घराच्या दिशेने धावत निघाली. मात्र, अंधारामुळे तिला घर कुठे आहे लक्षात न आल्याने ती घराच्या विरूद्ध दिशेने गेली. मात्र आपण चुकीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच ती पुन्हा माघारी घराकडे फिरली. याचवेळी लघुशंकेसाठी उठलेल्या रघुनाथ जाधव यांनी तिला रक्तभंबाळ अवस्थेत घराकडे रडत येताना पाहून तिच्या दिशेने धाव घेतली. घरी पोहचलेल्या चिमुकलीने घडलेल्या प्रकाराची माहिती दोन्ही मामा व आजीला दिली. त्याच वेळी वरती झोपलेल्या एका कामगाराचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरीला गेलेल्या मोबाई नंबरवर फोन केला असता समोरील अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करत मुलगी व मोबाईल दोन्ही मिळणार नसल्याचे सांगत पुन्हा शिवीगाळ करत फोन कट केला. त्यानंतर परत एकदा त्याने फोन उचलून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. गंभीर जखमी अवस्थेतील चिमुकलीला तात्काळ घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इकडे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तर सकाळी स्वतः पोलिस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे,सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत परिसर पिंजून काढला मात्र, सायंकाळ पर्यंत आरोपीचा शोध लागला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...