आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयहिंदनगर म्हाडा कॉलनी येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा सप्ताहात ७०० महिलांनी पार्थिव लिंगार्चन पूजन केले. विजयकुमार पल्लोड महाराज यांची शिवपुराण कथा सुरू आहे. यंदाचे हे अखंड हरिनाम सप्ताहाचे १७ वे वर्ष आहे. प्रवीण कुलकर्णी, प्रमोद गोंदीकर, मनोज तळणीकर, अभिनव जोशी, गिरीश कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चारात महिलांनी घरातील मातीपासून शिवलिंग तयार केले. केले. स्त्री-पुरुषांनी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आयुष्यात एकदा तरी पार्थिव शिवलिंग तयार करावे, असे पल्लोड महाराज म्हणाले. पूजन केलेल्या पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन सप्ताह समिती वाहत्या पाण्यात करणार असल्याची माहिती आयोजक समितीने दिली.
संस्कार जपा... आज सर्वांनी संस्कार पाळण्याची, ज्येष्ठांची सेवा करण्याची व परस्पर सहकार्याची गरज आहे. हीच सनातन मूल्ये आधुनिक काळातही मानवाचा उद्धार करणारी आहेत. छाया : रवी खंडाळकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.