आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी २९ जुलैला जाहीर झाली होती. या यादीत १८ हजार प्रशिक्षण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे होती. १८ हजारांपैकी ७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता ८ ऑगस्टला जाहीर होणारी दुसरी यादी प्रवेश फेरीनंतर ५ ऑगस्टला जाहीर केली. यात १२ हजार विद्यार्थ्यांची नावे आहेत. शहर आणि जिल्ह्यातील १७ आयटीआयची २ हजार ४६० प्रवेश क्षमता आहे. पहिल्या फेरीत ७०३, तर दुसऱ्या फेरीसाठी १५४९ विद्यार्थी पात्र आहेत. १२ ऑगस्टपर्यंत त्यांना ऑप्शन भरून देण्याची मुदत आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अर्थात डीव्हीईटीतर्फे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला गेल्या महिन्यात सुरुवात झाली होती. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत शासकीय आणि खासगी अशा एकूण १३७ आयटीआय संस्थ्या आहेत. या संस्थांमध्ये २०,६५६ जागा आहेत. या जागांसाठी २३ जुलैपर्यंत ६४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. डीव्हीईटीने २९ जुलैला सायंकाळी ५ वाजता प्रथम फेरीसाठीची पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. यात १८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ७ हजार विद्यार्थ्यांनी ५ ऑगस्ट प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीनंतरची प्रवेश यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती. पण, दिलेल्या मुदतीच्या आधीच म्हणजे ५ ऑगस्टला जाहीर झाली.
जिल्ह्यातील १७ आयटीआयमध्ये २४६० प्रवेश क्षमता
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यांतील १७ आयटीआयत २ हजार ४६० प्रवेश क्षमता आहे. दुसरी फेरी ५ ऑगस्टला झाली. त्यामध्ये १७ आयटीआयमध्ये ७०३ प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या फेरीत १५४९ जण पात्र आहेत. त्यांना १२ ऑगस्टपर्यंत ऑप्शन भरून देण्याची मुदत आहे. सध्या ३७ टक्के प्रवेश झाले असल्याची माहिती विभागीय सहसंचालक डी. एम. राठोड यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.