आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलार पंप:सहा वर्षांत घराच्या छतावर सोलार बसवणाऱ्यांच्या संख्येत 71.5 पटीने वाढ; 4 ते 5 वर्षांत खर्च होतो वसूल

संतोष देशमुख | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात २०१६ मध्ये १ हजार ७४ ग्राहकांनी घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून २० मेगावॅट वीजनिर्मिती केली होती. त्या तुलनेत डिसेंबर २०२२ पर्यंत ७६ हजार ८०८ (७१.५ टक्के) ग्राहकांनी सोलार बसवून १३५९ मेगावॅट वीजनिर्मिती केल्याची नोंद महावितरणने घेतली आहे. औरंगाबादेतील ४ हजार ६८ ग्राहक ५८ हजार किलोवॅट वीजनिर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे चार ते पाच वर्षांत सोलार पॅनलचा खर्च वसूल होत आहे.

२०१६ मध्ये राज्यात १०७४ ग्राहक होते. त्यात ७१ पटीने वाढ होऊन ७६,८०० ग्राहक झाले. सौरऊर्जेच्या वापराबद्दल शहरातील ग्राहकांचा वाढता कल समाधानकारक असल्याचे मत अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी व्यक्त केले. चालू आर्थिक वर्षातील दहा महिन्यांत राज्यातील घरांवर सौरऊर्जानिर्मिती संच बसवणाऱ्या ग्राहकांची संख्या २०,७२२ वाढली असून सौरऊर्जानिर्मिती क्षमतेत ३३१ मेगावॅटची भर पडली आहे.

असे होतात फायदे
२४ तास अखंडित वीजपुरवठा {पर्यावरण संवर्धन व स्वयंपूर्णता {इन्स्टॉलेशन चार्जेस वसूल झाल्यावर मोफत वीज अतिरिक्त वीज महावितरणला विकून कमाईची संधी विजेअभावी होणारे नुकसान कमी {वीज अपघातांचे धोके कमी

अर्ज कुठे करावा : सौरऊर्जानिर्मितीसाठी पॅनल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी महावितरणच्या महाडिस्कॉम डॉट इन / आयस्मार्ट या वेबसाइटवर अर्ज करावा. पॅनल बसवणाऱ्या एजन्सीची निवड ग्राहकांनी करावी. महावितरण सोलार पॅनल बसवण्यासाठी मंजुरी प्रमाणपत्र देते. ग्राहकांना आधी खर्च करावा लागतो. सौर पॅनल बसवले की अनुदान मिळते.

उपभोग आणि कमाईही, दोन मीटर बसवले
एक एक्स्पोर्ट व दुसरे इम्पोर्ट मीटर बसवले जाते. सोलार पॅनलद्वारे सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत सरासरी १५ युनिट वीजनिर्मिती होते. त्यातील ५ युनिट ग्राहकाने वापरले तर ५ युनिट महावितरण एक्स्पोर्ट करते. रात्री सौरऊर्जा मिळत नसल्याने महावितरणची वीज वापरली जाते. रात्री तीन युनिट वीज वापरली तर उर्वरित दोन युनिट ग्राहकांच्या बँकेत जमा असते. महावितरण युनिटप्रमाणे ग्राहकांना पैसे देते. सध्या २.२५ रुपये युनिट दर लागू आहे. ग्राहकांना ०.१०० युनिटसाठी ३.३६ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी ७.३३ रुपये, ३०१ ते ५०० युनिटसाठी १०.३७ रुपये, ५०१ ते १ हजार युनिटसाठी ११.८६ युनिटप्रमाणे वीज बिल आकारते.

वीज बिल चारपटीने कमी झाले
मी २०१६ मध्ये सोलार पॅनल बसवले. त्याआधी मला २५०० रुपये वीज बिल येत होते. आता ६०० रुपयांपर्यंत बिल येते. आता माझा वीज वापरही वाढलेला आहे. मी ४० हजार रुपये खर्च केले होते. तो खर्चही भरून निघाला. अनुदानाची रक्कम माझ्या बँक खात्यात जमा झाली. अनिल ढगे, ग्राहक, न्यू हनुमाननगर, औरंगाबाद.

टॅक्समध्ये ४० टक्के सवलत मिळते
आम्ही २०१७ मध्ये ११ लाखांत पंधरा किलोवॅटचे सोलार पॅनल बसवले. इंडियन ऑइलने ५ लाख सबसिडी दिली. आयकरात ४० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. वीज बिल ३५ हजारांवरून ६ ते ७ हजारांवर खाली आले.- चंदन भोजराज खिंवसरा, संचालक, राज पेट्रोल पंप

बातम्या आणखी आहेत...