आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्ग:मराठवाड्यात कोरोनाचे 73 नवीन रुग्ण आढळले; उस्मानाबाद ग्रीनमधून ऑरेंज झोनमध्ये

आैरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालन्यात 2 तर नांदेड, उस्मानाबाद येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण

साेमवारी मराठवाड्यात दिवसभरात कोरोनाचे ७३ नवीन रुग्ण आढळले. यात एकट्या औरंगाबादेत ६९ रुग्ण तर दोघांचा बळी गेला. नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एक तर जालन्यात कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले. एक रुग्ण सापडल्याने गेल्या ३६ दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये राहिलेला उस्मानाबाद जिल्हा आता ऑरेंज झोनमध्ये आला आहे. दरम्यान, हिंगोली, परभणी, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांत नवीन रुग्ण सापडला नाही.

  जालन्यातील एका नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती एका महिन्यापूर्वीच रुग्णालयात रुजू झाली होती. एका एसआरपीएफ पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. 

परंडा तालुक्यातील फळांच्या व्यापाऱ्याला संसर्ग

उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ दिवसांनंतर म्हणजे ४ एप्रिलनंतर सोमवारी नवीन  रुग्ण आढळून आला आहे. परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मो भाजीपाला तसेच फळांचा व्यापारासाठी पुणे तसेच मुंबईला जाऊन आला होता.

नांदेडमध्ये एक रुग्ण : शहरात सोमवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. सोमवारी ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...