आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवद्गीतेच्या अठरा अध्यायांना अनुसरून असलेल्या गीतांमध्ये ७१ वर्षीय अर्चना मुळे यांनी “मानवतेचे मंदिर माझे..कामधाम संसार विसरली’ हे गीत गायिले, तर वयाच्या ७३ व्या वर्षी “राधा गौळण करिते मंथन’ गाणे सरोज बासरकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे गुरुवारी अद्वैत महिला मंडळातर्फे भगवद्गीतेच्या अध्यायावर आधारित गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष भरत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. राजश्री देशपांडे यांनी “नमस्कार माझा या...’ गीताने गायनाची सुरुवात केली. स्वाती कुलकर्णी यांनी “विमोह त्यागून...., समाधी साधन..,निजरुप दाखवा हो..’ गाणी सादर केली. ७१ वर्षीय मंगळा पनाळे यांनी “तूच करता आणि करविता’ सादर केले. सुजाता नाईक यांनी “मृदुल करांनी छेडित तारा ...’, रेणू आमलेकर, शांभवी देशपांडे, सिंधुताई देशपांडे, सुजाता नाईक यांनीही गीताचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन मुग्धा कुलकर्णी, तबल्यावर विश्वास काळे, हार्मोनियमवर अशोक पाध्ये, दुर्गा देशमुख यांनी टाळवादनाची साथसंगत केली. श्रीकांत पत्की यांनी सूत्रसंचालन केले, आभार विभा श्रीवास्तव यांनी मानले.
महिनाभराच्या तयारीने गाणी बसवली महिनाभरात ५० ते ७३ वयोगटातील महिला सदस्यांनी गाण्याची तयारी केली. यात पाच महिलांनी पहिल्यांदा स्टेजवर गाणी गायली. १९६० ते १९८० सालातील गाण्याची निवड केली. मुग्धा कुलकर्णी, अध्यक्षा, अद्वैत महिला मंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.