आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा73 व्या भारतीय वाणिज्य परिषदेचे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजन केले जाणार आहे. भारतीय वाणिज्य परिषदेचे सचिव डॉ. पुष्पेन्द्र मिश्रा यांचे (11 जून) कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले यांना प्राप्त झाले आहे. परिषदेच्या आयोजनासाठी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे परिश्रम घेत आहेत. त्यांची महासचिव तथा मुख्य आयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.
लखनऊ येथील डॉ. पुष्पेन्द्र मिश्रा, दिल्ली येथील डॉ. नवल किशोर, इंदौर येथील डॉ. रमेश मंगल व प्रा. डॉ. अरविंद कुमार यांच्या समितीने विद्यापीठातील पायाभूत सुविधांची एप्रिल-2022 दरम्यान पाहणी केली होती. या समितीने कुलगुरू डॉ. येवले यांच्याशी त्यावेळी परिषद आयोजनाच्या संदर्भात चर्चाही केली होती. आता वाणिज्य परिषदेच्या केंद्रीय समितीने विद्यापीठात भारतीय वाणिज्य परिषद घेण्यास मान्यता दिली आहे.
दहा वेगवेगळ्या समित्यांचे गठण
25 वर्षानंतर विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. देश-विदेशातून चार हजार प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहे. या परिषदेत 7 वेगवेगळे टेक्निकल सेशन्स होतील. बीबीएवाय, मनुभाई शहा मेमोरियल लेक्चर. सौरभ शिवारे मेमोरियल लेक्चर आयोजित केले जाणार आहेत. कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेत नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली आहे. यावेळी दहा वेगवेगळ्या समित्यांचे गठण करण्यात आले आहे. सर्व समित्यांचे प्रमुख डॉ. सरवदे राहणार आहेत.
नामवंत व्यक्तींचाही सहभाग
त्याशिवाय डॉ. सय्यद अझहरुद्दीन, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. के. एल. साळवे, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ. एच. जी .विधाते, डॉ. सत्यप्रेम घुमरे, डॉ. फराह नाज गौरी, प्राध्यापक डॉ. विना हुंबे, डॉ. सुखदेव मानटे, डॉ. अभिजीत शेळके, डॉ. भारती गवळी, डॉ. राजेश रागडे, डॉ. माधुरी सावंत, डॉ. एस. डी. तळेकर, डॉ. एम. एस. वाघमारे यांच्या अध्यक्षतेत वेगवेगळ्या समित्यांचे गठण करण्यात आले आहे. विद्यापीठातील माजी विद्यार्थी संघटना, औद्योगिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचाही सहभाग राहणार आहे. दीड हजार पेक्षा अधिक विषयावर संशोधनपर लेख सादर केले जातील. माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबन तायवाडे, डॉ. टी. यु. शिवारे परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.