आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक रस्त्यावरील 75 अतिक्रमणे काढली

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सोमवारी सिडको एन-५, एन-६ व एन-८ परिसरातील ७५ अतिक्रमणे काढली. बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकदरम्यान कच्ची-पक्की बांधकामे जेसीबीने पाडली. सिडको भागातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम २ मार्चपासून सुरू आहे. पण ती संथगतीने सुरू असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना कॉस्ट लावली होती. त्यानंतर मोहिमेला गती मिळाली आहे.

बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकदरम्यान नागरिकांनी घरासमोरील पार्किंग व माेकळ्या जागेत अनधिकृत बांधकामे केली होती. ही पाडण्यात आली. तसेच काही जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. एन-५, जीएसटी कार्यालय, चिश्‍तिया चौकाच्या पुढे आविष्कार कॉलनी चौक, साईनगर चौक, पूर्व-पश्चिम बाजूने रस्त्यावर बांधलेले शेड व लहान-मोठी दुकाने काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...