आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन करण्याचा निर्णय:75 स्वातंत्र्यसैनिक मुक्ती दिनापासून आझाद मैदानावर आंदोलन करणार; राज्य, केंद्राने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या अमृतमहोत्सवामध्ये ‘आम्ही पारतंत्र्यात जिंकलो, मात्र स्वातंत्र्यात हरलो’ अशा संतापजनक शब्दांमध्ये भावना व्यक्त करत स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या पाल्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बेमुदत आंदोलन १७ सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर केले जाणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे राज्य सचिव अप्पासाहेब शिंदे यांनी दिली.

राज्याध्यक्ष भाऊसाहेब सोळंके, उपाध्यक्ष जवाहरलाल सारडा यांनी सांगितले की, देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ स्वातंत्र्यसैनिक ७५ झेंडे खांद्यावर घेऊन मुंबई येथील हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पायी चालत राष्ट्रघोष करणार आहेत. तसेच मंत्रालयातील तिरंग्याला मानवंदना देऊन रांगेमध्ये उभे राहून राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे. त्यानंतर भारत माता की जय आणि वंदे मातरम या दोन घोषणा देऊन पुन्हा आंदोलन करण्यासाठी सर्व ७५ स्वातंत्र्यसैनिक रवाना होणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत दैनंदिन आंदोलन केले जाईल. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेऊन प्रश्न निकाली काढावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...